चौके तलाठी कार्यालय, चाफेखोल तलाठी कार्यालय व सुकळवाड मंडळ कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन..

चौके तलाठी कार्यालय, चाफेखोल तलाठी कार्यालय व सुकळवाड मंडळ कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन..

चौके /-

गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या असलेल्या मागणीनुसार चौके येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय, चाफेखोल येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय व सुकळवाड येथे नवनिर्मित मंडळ कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांचे उदघाटन आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,सिंधुदुर्गातील विखुरलेली भौगोलिक स्थिती त्यातच अनेक गावासाठी एक तलाठी सझा असल्याने सातबारा व इतर कामासाठी लोकांची हेळसांड होत आहे. तलाठ्यांवरही कामाचा ताण होत आहे. त्यामुळे लोकांची कामे होण्यास विलंब होत होता. हि बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात नवीन तलाठी सझा व महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे.यामुळे येथील लोकांना आता सातबारा व इतर कामे गावातच करणे सोयीचे होणार आहे असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून मालवण तालुक्यात १२ तलाठी सझांची व २ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे.

या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी चौके येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी,प्रभारी तहसीलदार आंनद मालवणकर, मंडळ अधिकारी उमेश राठोड, तलाठी रविराज शेजवळ, कमलाकर गावडे, बाळ महाभोज, अजित पार्टे, बी.जी.गावडे, संजय गावडे, विष्णू चौकेकर, रामचंद्र गावडे, नारायण काटकर, आदींसह ग्रामस्थ.

चाफेखोल येथे शिवसेना विभाग प्रमुख विजय पालव, अल्पेश निकम, उपसरपंच सोमनाथ पानवलकर, राजलता गोसावी, रविना घाडीगांवकर, प्रवीण शिंदे, सरोज बाळवळेकर, आंनदी खांदारे, तलाठी चारुशीला पेडणेकर जाधव, कृषी सहाय्यक प्रियांका धडे, आदींसह ग्रामस्थ,
सुकळवाड येथे उपसरपंच स्वप्निल गावडे, माजी सभापती प्रसाद मोरजकर, माधवी बांदेकर, प्रकाश पावसकर, ग्रामसेवक महेंद्र मगम,तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, प्रसाद दळवी, अनंत चव्हाण, नरेंद्र पाताडे, भरत केळवलकर,मंडळ अधिकारी यु.एन राठोड, तलाठी कृष्णा सामंत, नांदोस तलाठी ऐश्वर्या वालावलकर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..