महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आरोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आरोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश..

सावंतवाडी/-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत संपन्न होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी आरोंदा हायस्कूल आरोंदा या माध्यमिक प्रशालेत सन २०२० मध्ये प्रविष्ट पाच विध्यार्थ्यांमधून तीन विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

वेदिका वामन, कोरगावकर २८८ पैकी १९४ गुण, किरण प्रवीण नाईक १७४ गुण, भाग्यश्री जितेंद्र जाधव १५० गुण हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..