सावंतवाडी /-
सावंतवाडी कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिने बंद असलेली मंदिरे जनतेसाठी खुली करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सावंतवाडी तालुक्याच्यावतीने उद्या मंगळवार सकाळी ठीक ११ वाजता प्रांत कार्यायासमोर मनसेच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका सचिव विठ्ठल गावडे यांनी केले आहे.