अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर या तरुणांचा पुढाकार...

मालवण /-
व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अश्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण दसरोत्सवाच्या निमित्ताने मालवण शहरात करण्यात आले. अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर या तरुणांचा पुढाकारातून ही रुग्णवाहिका
मालवण वासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे.

गंभीर स्थितीतील रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी नेण्यासाठी ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका आवश्यक असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अश्या दोन रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्यातील ही तिसरी रुग्णवाहिका असून मालवणातील पहिलीच कार्डिअक
रुग्णवाहिका आहे. अत्यावश्यक स्थितीत रुग्णवाहिकेत डॉक्टरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या रुग्णवाहिकेतून मालवण शहरात मोफत सेवा दिली जाणार आहे. तर रुग्णाला मालवण शहाराबाहेर अन्य रुग्णालयात नेण्यासाठी माफक दरात सेवा उपल्बध असेल. अशी माहिती अवधूत परुळेकर यांनी दिली.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते मालवण पिंपळ पार येथे ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर यांसह उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक
दीपक पाटकर, गणेश कुशे, पंकज सादये, महेंद्र म्हाडगूत, जॉन नरोना, मोहन वराडकर, प्रसाद परुळेकर, सुबोध गावकर, बाबा मांजरेकर व अन्य नागरिक उपस्थित होते.

वेळेत उपचार उपलब्द होऊन रुग्ण बरा व्हावा. यासाठी उपलब्ध करण्यात आलेली ही ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका रुग्णांना संजीवनी ठरेल. असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page