कुडाळ /-
कुडाळ शहरातील वाहन चालकांना अत्यंत त्रासदायक ठरलेल्या उद्यमनगे ते पोलीस स्टेशन रस्त्याची मोजणी आता सोमवारी २६ ऑक्टो. पासून सुरु होणार असून तशी सूचना जमीन मालकांना देणारी नोटीस भूमी अभिलेख कडून बजावण्यात आली आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून उद्यमनगर ते एस. एन देसाई चौक या रस्त्याची नेहमीच चलन होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत प्रशासन यांनी अनेक बांधकामांना अभय दिला आहे. सध्या हॉटेल राज ते एस. एन. देसाई चौक हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून पुढील कित्येक महिने तो बंद राहणार आहे त्यामुळे वेंगुर्ला रस्त्याने येऊन मुंबई व गोव्याकडे जाणारी सर्व वाहने हि या मांडल्या रस्त्याने जात असून मोठे कंटेनर सुद्धा वाहतूक करतात त्यामुळे कित्येक वेळा वाहतूक कोंडी होत आहे. एस. एन. देसाई चौकात नेहमीच ४ ते ५ वाहतूक पोलीस उभे असतात परंतु ते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत त्यामुळे या ठिकाणी आता कायम स्वरूपी वाहतूक पोलिसांची गरज निर्माण झाली आहे. मोजणी नंतर अनेक गोष्टींचा खुलासा होणार असून रास्ता रुंद होणार कि नाही याबाबत भूमी अभिलेखने नेहमीच गोंधळ घातलेला असून आता तरी यातून मार्ग निघणार का असा सवाल कुडाळ वासियांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीची मोजणी धुवाधार पावसाने थांबविली होती आता तरी मोजणी व्हायला निसर्ग साथ देईल का हाही प्रश्न आहेच.