सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे संकेत;महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचेही केले सूतोवा
कुडाळ /-
जिल्हा बँकेच्या निवडणुका या डिसेंबर महिन्यात घेण्याचा प्रयत्न चालला असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येतील असा, निर्णय झाला आहे. त्यानुसारच जिल्हा बँकेच्याही निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
कुडाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.पाटील म्हणाले, आज जिल्ह्यात आल्यावर सहकाराबाबतआढावा घेतला. सहकारी सोसायट्यांच्या तक्रारी व प्रश्न आहेत, त्या सोडवल्या जातील, पीक कर्ज वाटप बाबतही तक्रारी आहेत. कर्जाबाबत जिल्हा बँकेने चांगले काम केले आहे. भात खरेदी केंद्र बाबतही निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्याला हमीभाव देण्याबाबत प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेकडून दुजाभाव दिला जातो, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. यावर पाटील म्हणाले, याबाबत चर्चा केली जाईल योग्य तो न्याय दिला जाईल.६०-२०-२० प्रमाणे डीपीडीसीत पदे दिली जातील. जिल्हा बॅंकेच्या निवडणुका डिसेंबर महिनापर्यंत होतील. संकटावेळि कोणी राजकीय टीका करू नये हे पथ्य आपण पाळले आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी-काॅगेस असे तीनही पक्ष एकत्र येवून लढवणार आहेत असे.त्यांनी स्पष्ट केले.