मालवण /-
येथील रोटरी क्लबच्यावतीने जागतिक पोलिओ दिनानिमित्त आज शहरात जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिओ मुक्तीबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.
यात रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड. हेमेंद्र गोवेकर, सेक्रेटरी उमेश सांगोडकर, डॉ. अजित लिमये, डॉ. लिना लिमये, खजिनदार अभय कदम, सुहास ओरसकर, चाचा हडकर, रतन पांगे, संजय गावडे, महेश काळसेकर, प्रसन्नकुमार मयेकर, अमरजीत वणकुद्रे तसेच इतर उपस्थित होते. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.