कोल्हापूर/-
चंद्रे ( ता. राधानगरी ) येथे उध्या विजयादशमीनिमित्त होणारा सिमोलंघ्घन व अन्य कार्यक्रम कोरोणाच्या पाश्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याची माहीती गावचे पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी दिली.
सालाबादप्रमाणे चंद्रे येथे प्रत्येकवर्षी मोठ्या उत्साहात शाही दसरा संपन्न होत आसतो.पाटील घरण्याकङे या उत्सवाचे मूख्य मानकरी असतात.त्यांच्याकङून या उत्सवाचा खर्च केला जातो.यावर्षीचा मान सूभाष पाटील””एस आर पाटील बाबासो पाटील यांच्या घराण्याकङे आहे.यावर्षी देऊळ बंद असल्याने भक्तांची गर्दी जास्त प्रमाणात झाली नव्हती रात्री पोलिस पाटील व बारा बलूतेदारांनी पालखी सोहळा केला .त्यानंतर आरती करण्यात आली
उद्या गावात नारळ फोङण्याचा कार्यक्रम होणार नाही.तसेच गावातील नागरिकांनी पालखीची वाट न पाहाता प्रत्येकांनी आपआपले कूंभ घेवून ओङ्यावर जावून विर्सजित करावे असे आव्हान ही पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी केले आहे.