ब्युरो न्यूज /-

▪️हिमालयाच्या पर्वतरांगांपासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली.

▪️अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर हे पुढील आठवड्यात नवी दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिका प्रशासनाने ही भूमिका मांडली आहे.

▪️चीन आणि भारत यांची सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक समोरासमोर ठाकल्यापासून अमेरिका या तणावाच्या परिस्थितीवर बारकाईने नजर ठेऊन आहे. अमेरिकेने भारताला नेहेमीच सहकार्य केले आहे.

▪️शस्त्रास्त्रांचा पुरवठा, एकत्रित सैन्य कवायती, माहितीची देवाण- घेवाण अशा प्रकारे अमेरिका सहकार्य करीत आहे. हिमालयातील सीमारेषांबरोबरच दक्षिण चिनी समुद्रात सुरू असलेली चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी भारताचा या क्षेत्रात वावर वाढायला हवा.

▪️केवळ या दोन ठिकाणीच नव्हे, तर संपूर्ण आग्नेय आशियामध्ये भारताने आपला प्रभाव निर्माण करावा, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे.

▪️भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सन २०१६ पासून संरक्षणविषयक भागीदारी आहे. सध्याच्या काळात तर भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासार्ह साथीदार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page