कणकवली /-

शैक्षणित सन २०१९-२०२०
वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक (इ.८वी) शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये कणकवली एस.एम.प्रशालेच्या विद्यार्थ्यानी सुयश संपादन केले आहे. तसेच इयत्ता ८ वी मधुन १४ तर इयत्ता ५ वी मधुन १८ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता ८ वी प्रथम परीतोष राणे-२४८ गुण, द्वितीय स्वरा बाणे-२१८ गुण, तृतीय ओम गोसावी-१९८ गुण, चतुर्थ पायल नाईक- १९६ गुण तर इयत्ता ५ वी मधुन वेदिका काजरेकर-२१६ गुण, द्वितीय धारा कदम-२०८ गुण, तृतीय रोमा ठाकुर-१९४ गुण मिळवत विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त केले आहेत.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन श्री.डॉ. तायशेटे, सचिव श्री. नलावडे, उपकार्याध्यक्ष श्री. काणेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पोतदार सर, उपमुख्याध्यापक श्री. जोशी सर, पर्यवेक्षिका सौ. मसुरकर तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page