वेंगुर्ला /-

तालुक्यातील मठ गावात गेल्या दोन दिवसात बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.याबाबत त्वरित लक्ष पुरवावे,अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच निलेश नाईक व आबा मठकर यांनी दिला आहे.मठ गावात बीएसएनएलचा टॉवर कार्यान्वित असूनही वारंवार येथील अनियमित व गायब नेटवर्कमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.आजारी व्यक्ती तसेच इतर सर्वांनाच नेटवर्क नसल्याने समस्या निर्माण होत आहेत.याबाबत त्वरित लक्ष न पुरविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page