आस्था ग्रुपच्या वतीने आशिष झाटये याचा सत्कार..

मालवण /नीट परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात 19 वा क्रमांक मिळवून मालवणचे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या आशिष अविनाश झाटये याला मालवण मधील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आस्था ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांच्या हस्ते आशिष यास सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी डॉ. अविनाश झाटये, डॉ. शिल्पा झाटये आस्था ग्रुप चे उपाध्यक्ष सौगंधराज बादेकर, सचिव मनोज चव्हाण, खजिनदार बंटी केनवडेकर, सदस्य भाऊ सामंत, अगस्तीन डिसोजा, कुणाल मांजरेकर पी.के. चौकेकर ,संग्राम कासले आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..