वैभववाडी-
वैभववाडी वैभववाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत शनिवारी 2 ने वाढ झाली आहे.वैभववाडी तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 74 झाली आहे.शनिवारी किरोना पॉझिटिव्ह आढळले दोन्ही रुग्ण मुंबईतील चाकरमानी आहेत.दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कणकवली येथील कोरोना बाधित नातेवाईकांच्या संपर्कात होते. वैभववाडी तालुक्यात शनिवारी 7 जणांनी कोरोनावर मात केली त्यांना घरी सोडण्यात आले.तर अजून 20 कोरोना पॉझिटिव्ह सांगूळवाडी येथील कोविड कक्षात उपचार घेत आहेत.13 व्यक्ती चे स्वब घेतलेलेआहेत. शुक्रवारी तालुक्यातील रुग्णालयात सेक्युरिटी गार्ड व त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यांना सांगूळवाडी येथील कोविड कक्षात दाखल केले मात्र ते दोघेही एडगाव येथील घरी पळून घेणे होते.त्यांना आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले.सध्या ऊन पाऊस सुरू आहे प्रत्येक व्यक्तीने आपली काळजी द्यावी .जर कोणाला प्राथमिक कक्षणे आढळून आली तर शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.