विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान.;सतीश सावंत.

विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान.;सतीश सावंत.

वेंगुर्ला /-

विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने सिधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत विचारणा करणार असल्याचे जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची शेतकरी व बागायतदार यांचे शिष्टमंडळ भेट घेणार असे एकमताने ठरविण्यात आले.

वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा, काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंचची सभा अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी सिधुदुर्ग जिल्हा बँके।अध्यक्ष सतीश सावंत, आंबा बागायतदार विवेक कुबल, सचिव विलास ठाकूर, दीपक भगत, महेश बोवलेकर, सदाशिव आळवे, प्रता आसोलकर, बबन साळगावकर, प्रताप गावसकर, विष्णू मांजरेकर, प्रकाश डिचोलकर, प्रकाश गडेकर, निलेश चमणकर आदी उपस्थित होते.

लविमा कंपनीच्या यावर्षीच्या बदलत्या निकषाबद्दल संताप व्यक्त करुन शेतकऱ्यांनी याविषयी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच आपल्या मालाचे मार्केटींग करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने शेतकरी बागायतदारांनी संघटीतपणे पुढे यायला हवे. शासनाकडून अशा मार्केटींग करण्यासाठी मदतीची गरज आहे. शेतावर वा बागायतीवर फवारण्या जास्त न होता दोन ते तीनच झाल्या पाहिजेत.

यासाठी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सावंत यांनी विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने याबाबत जिल्हाधिकारी यांची शेतकरी व बागायतदार यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

अभिप्राय द्या..