कुडाळ /-
माजी पालकमंत्री श्री दिपकभाई केसरकर यांच्याकडे शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी शाळा दुरुस्ती साठी निधीची मागणी केली होती त्यानुसार दिपकभाई केसरकर यांनी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांच्या कडून सदर शाळा इमारतींचा सर्व्हे करून दुरूस्ती आवश्यक शाळांची यादी तयार करून त्यास आवश्यक असलेला निधी जिल्हा वार्षिक नियोजन मधून 8 कोटी रुपये मंजूर केला होता.परंतु जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थापोटी आपल्या मर्जीतील शाळा दुरुस्ती यादी मंजूर केली असून कुडाळ मालवण व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शाळा दुरुस्ती कामे हेतू पुरस्कर वगळली आहेत.त्यामुळे ज्या शाळांच्या इमारती तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक होते अशा शाळांवर व ज्या गावांमध्ये सदर शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे. असा आरोप नागेंद्र परब यांनी केला आहे.
अति आवश्यक शाळांची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी गटनेते नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हेमंत वसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून सदर शाळांना प्राधान्य देऊन मंजूर यादीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते उपस्थित होते.