ब्युरो न्यूज /-

कोरोनाच्या संकटाने साऱ्या उद्योगक्षेत्राला ग्रासलेले असताना, घरबांधणी क्षेत्राला मात्र चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरांच्या आकर्षक किमतींबरोबरच गृहकर्जदर व मुद्रांक शुल्कातील कपातीने घरखरेदीचे स्वप्न बाळगणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक घटकांवर विपरीत परिणाम झाला असला तरी माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या निवारा म्हणजेच घराची गरज कायम आहे. नव्या ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे चांगल्या घरांची गरज वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन विविध बांधकाम व्यावसायिक आपल्या प्रकल्पांमध्ये आधुनिक सुविधा देऊ करीत आहेत. प्रत्यक्ष राहण्यासाठी घर हवे आहे, त्यांच्यासाठी तर सध्याचा सणासुदीचा काळ ही सुवर्णसंधी ठरण्याची शक्यता आहे.

याचबरोबर गुंतवणूक म्हणून घर घेणाऱ्यांनाही बदललेल्या परिस्थितीत ही संधी खुणावू शकते. तुम्ही खरोखरच घर घेणार असाल आणि बऱ्यापैकी ‘डाउनपेमेंट’ करण्याची तयारी असल्यास बांधकाम व्यावसायिकांकडून आकर्षक सवलत मिळण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष वाटाघाटीच्यावेळी बांधकाम व्यावसायिक काही प्रमाणात सवलतीचा दर देत आहेत आणि त्याचा लाभ या काळात घेता येऊ शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.

‘मुद्रांका’तील कपातीचा फायदा
कोरोनाच्या काळात थंडावलेल्या घरखरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. येत्या ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना ५ टक्क्यांऐवजी २ टक्के, तर जानेवारी ते मार्च २०२१ या काळात खरेदी करणाऱ्यांना ३ टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. मोठ्या रकमेच्या घरखरेदीच्या बाबतीत हा दिलासा बऱ्यापैकी असू शकतो.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे
प्राप्तिकर सवलतीचा अतिरिक्त लाभ
गृहकर्जाच्या हप्तारूपी परतफेडीवर प्राप्तिकर कायद्यानुसार बऱ्यापैकी सवलत मिळत असल्याने घरखरेदीदारांना करबचतीचा लाभही होत असतो. हप्त्यातील मुद्दलाच्या परतफेडीवर कलम ८० अन्वये दीड लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत वजावट मिळते, तर कलम २४ बी नुसार व्याजाच्या दोन लाख रुपयांच्या रकमेपर्यंत वजावट मिळते. या दोन्ही वजावटी मिळाल्याने घरखरेदीच्या समाधानाबरोबरच करबचतीच्या रूपाने आर्थिक लाभही होतो.
कशी आहे परिस्थिती? अनेक वर्षे रिअल इस्टेट क्षेत्र मंदीच्या छायेत.
घरांच्या विक्रीला खीळ बसल्याने बांधकाम व्यावसायिक अडचणीत.
घरांच्या उपलब्धतेच्या तुलनेत मागणी रोडावली.

कशामुळे मिळेल चालना?
•दसरा-दिवाळीनिमित्त ऑफर्स.
•गृहकर्जाचे व्याजदर
नीचांकी पातळीवर.मुद्रांक शुल्कात सरकारकडून कपात.
•प्राप्तिकर सवलतीचा अतिरिक्त लाभ.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे
कर्जाचे व्याजदर नीचांकी पातळीवर
सर्वसाधारणपणे अनेक जण गृहकर्ज घेऊनच आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करताना दिसतात. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सातत्याने कपात केल्यामुळे कर्जावरील व्याजदर बरेच खाली आले आहेत.
•त्यातही गृहकर्जाचे व्याजदर कमी ठेवले जातात. सध्या स्टेट बँक किंवा एचडीएफसी सारख्या नामवंत संस्थांकडील गृहकर्जांचे व्याजदर ६.९० ते ७ टक्क्यांच्या पातळीवर खाली आले आहेत. त्यामुळे गृहकर्ज ही घरखरेदीदारांसाठी संधी मानली जात आहे.
•सध्याच्या परिस्थितीत घरांच्या किमती कमी झाल्या असून, बांधकाम व्यावसायिकदेखील सवलतीच्या दराच्या आकर्षक ऑफर घेऊन येत आहेत.

मागील काही वर्षांचा विचार केला, तर गृहकर्जावरील व्याजदर खूपच कमी झाला असून, आता तो ७ टक्क्यांपर्यंत आला आहे, त्याचा फायदा ग्राहकांना निश्चित मिळेल. याबरोबरच महाराष्ट्र सरकारने मालमत्ता व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात केलेली कपात महत्त्वाची ठरणारी आहे. त्यामुळे सध्याची वेळ ही घरखरेदीसाठीची सर्वोत्तम वेळ आहे.

सद्यःस्थितीत स्थिर असलेले घरांचे दर, अनलॉकनंतर बांधकामाला जोमाने झालेली सुरुवात, मुद्रांक शुल्कातील कपात व गृहकर्जावरील कमी व्याजदर या सर्व बाबींचा आर्थिक फायदा घर खरेदीदाराला होऊ शकतो. गृहखरेदीची हीच सकारात्मक भावना मागील दोन आठवड्यांपासून आम्ही अनुभवतो आहोत. ग्राहकांचा घर खरेदीसाठीचा उत्साह हा मागील नवरात्रासारखाच असून, नागरिक चौकशी व बुकिंग करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page