केळूस तारादेवी मंदिरास सामाजिक कार्यकर्ते विलास गावडे यांच्याकडून देण्यात आली सँनिटायझर मशिन..

केळूस तारादेवी मंदिरास सामाजिक कार्यकर्ते विलास गावडे यांच्याकडून देण्यात आली सँनिटायझर मशिन..

उपसरपंच आबा खवणेकर यांच्या पाठपुराव्यातून उपलब्ध झाली सँनिटायझर मशिन..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावातील ग्रामदैवत तारादेवी मंदिरास वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते,जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष,जिल्हा बँक संचालक विलास गावडे आणि वेंगुर्ला तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत यांच्या माध्यमातून सँनिटायझर मशिन आणि सँनिटायझर बाँटल भेट देण्यात आली आहे.

हाताचा स्पर्श न करता सँनिटायझरचा वापर करता येईल अशी अत्याधुनिक मंदिरास भेट देण्यात आली.पँडलचा वापर करून सँनिटायझरचा उपयोग करता येणारी हि मशिन मंदिरात बाह्य दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि नागरिकांना आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने हि मशिन उपयुक्त ठरणारी आहे.

केळुस गावचे उपसरपंच व पत्रकार श्री आबा खवणेकर यांच्या विनंतीवरून आणि पाठपुराव्यामुळे हि मशिन विलास गावडे आणि विधाता सावंत यांच्या माध्यमातून मंदिरास देण्यात आली आहे.

घटस्थापना आणि शारदीय नवरात्रौसत्वाचे औचित्य साधत मंदिरात बाह्य दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने केळुस तारादेवी भगवती मंदिरास आज हि मशिन प्रदान करण्यात आली.

यावेळी केळुस ग्रामपंचायतीचे उपसरपंच आबा खवणेकर,श्री तारादेवी,भगवती देवी,घाडवस,महादेव,ब्राम्हण सेवा समिती मुंबई,केळुसचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष दिपक प्रभू ,पुजारी च॔द्रकात उर्फ कांता राऊळ,माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ केळुसकर,पुजारी शेखर राऊळ,ग्रामस्थ सुजित उर्फ चिमण केळुसकर,गोपाळ वेंगुर्लेकर,भूषण वाककर,उमेश मुणनकर,जयदेव केळुसकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..