चौके भराडी मंदिरात जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक एकवटले.

पारंपारिक चिरेखाण व्यवसाय टिकवण्यासाठी नविन कार्यकारिणी स्थापन.

चौके /-

सिधुंदूर्ग जिल्ह्यातील पारंपारीक व्यवसायातील हजारो कुंटुबांना रोजगार देणारा चिरेखाण व्यवसाय गेले काही वर्षे शासनाच्या जाचक अटीत अडकला असून अल्प मुदतीचा परवाना बंद करण्याचा शासन निर्णय झाला असल्याने यापूर्वी अल्प मुदतीत व्यवसाय करण्याऱ्या चिरेखाण व्यावसायिकांपुढे शासनाच्या जाचक अटींचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय बंद झाला तर शेकडो तरुण चिरेखाण व्यावसायिक संकटात येतील याबरोबर गंवडी, कामगार, डंपर मालक, यांच्यासह या व्यवसायावर अवलंबून अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.शासनाने यावर विचार करून पूर्वीप्रमाणेच परवाना द्यावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करून हा पारंपरिक चिरेबंदी घर बाधण्यासाठी उपयुक्त व्यवसाय चालू राहण्यासाठी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सर्व पारंपारिक चिरेखाण व्यावसाईक एकवटले असून हा व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालू राहण्यासाठी पक्षविरहीत जिल्हा चिरेखाण संघटनेची स्थापना चौके भराडी देवी मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.

यावेळी नविन जिल्हा संघटना कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष – प्रमोद कांबळी (कणकवली ), सचिव – मिलिंद साटम ( देवगड) , उपाध्यक्ष-बिजेंद्र गावडे (चौके) , अमित साटम (देवगड), महादेव पारकर (असरोंडी) , मदन सातोसकर ( सावंतवाडी), खजिनदार- दत्ता गावडे (चौके ), सल्लागार संतोष गावडे (चौके) यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. सदर जिल्हास्तरीय बैठकीसाठी जिल्हातील सर्व तालुक्यातील जेष्ठ व तरुण १०० च्या आसपास चिरेखाण व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या माध्यमातून दर महिन्याला प्रत्येक तालुक्यात एक बैठक घेऊन चिरेखाण व्यवसायासंबधी चर्चा करण्याचे तसेच व्यवसायातील भेडसावणारे प्रश्न सोडवण्याचे काम निपक्षपातीपणे संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. या बैठकिचे आयोजन चौके चिरेखाण संघटनेने केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page