मालवण /-

राजरोसपणे चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले. याची कार्यवाही न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर यांनी दिला आहे.
आज मालवण शहरासोबतच तालुक्यात, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत दारु धंदे, मटका, वेश्याव्यवसाय, अनधिकृत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या अनधिकृत धंद्यांवर मालवण पोलिसांकडुन धाड टाकलेली दिसुन येत नाही. आधीच कोरोना काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बेरोजगारी वाढलेली आहे. तरुणांमध्ये निराशा आहे. आज अनेक भागात गोवा बनावटीची दारू विक्री व अनधिकृत वाहतूक होत आहे. यामुळे तरुण वर्ग नाहक व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. कुटुंबे उदध्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्या पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत येत असणार्‍या अनधिकृत दारु धंदे, गोवा दारू, मटका, वेश्याव्यवसाय, अनधिकृत गुटखा विक्री त्वरित बंद करण्यात यावेत. याबाबतची कार्यवाही न झाल्यास आम्हाला आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागेल. उद्भवणार्‍या परिस्थितीस पोलिस यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, महिला शहराध्यक्षा भारती वाघ, महिला उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, उदय गावडे, नंदकिशोर गावडे, उपशहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे उपतालुकाध्यक्ष संकेत वाईरकर, मनविसे शहराध्यक्ष साईराज चव्हाण, विजय गावडे, दिनेश कदम, सचिन गावडे, सुशील चव्हाण, दत्तराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, रेकी फर्नांडिस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page