✍🏼लोकसंवाद सिंधुदुर्ग.

राज्य अध्यक्ष सन्माननीय विजयजी कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.सभेला राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.आकस बुद्धीने राज्याचे अध्यक्ष यांच्यावर केलेल्या कारवाईचा
सभेच्या सुरुवातीलाच सभागृहत निषेध करण्यात आला. विजयजी कोंबे बेधडक,अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणुन राज्यभरात ओळखले जातात. त्यांच्यावरील कार्यवाही मुळे राज्यभरात असंतोष पसरलेला आहे.झालेली कारवाई नजीकच्या काळात रद्द झाली नाही तर शिक्षक समिती कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र भर आंदोलन उभे करेल.महाराष्ट्रातील शिक्षक अध्यक्ष यांचे पाठीशी ठामपणे उभे राहतील असा ठराव सभागृहाने केला जातो.

विद्यार्थी हितासाठी आंदोलन पुकारले जाईल. आंदोलनाची दखल घेऊन 15 जुलैचा आदेश रद्द करावा अन्यथा याविरोधात पालक, समाजाला सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडले जाईल. . सर्व जिल्हा शाखांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सर्व जिल्ह्याना धन्यवाद देण्यात आले . आणि आचारसंहितेमुळे आंदोलन न झालेले जिल्हे 7 जुलैला आंदोलन छेडतील असे आदेशीत केले.

0 ते 14 वयोगटातील विद्यार्थी आणि तत्संबंधी कामे करणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र या मुलांकडे दुर्लक्ष करून वयोगगटाच्या बाहेरील निरक्षरांचे नवभारत प्रशिक्षण आण तत्संबंधी कामे आम्ही करणार नाही असा ठराव शिक्षक समिती कार्यकारिणीने घेतला.

राज्यामध्ये पदवीधर, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या हस्ते पदोन्नती दिल्या जात नाही. तुम्ही कार्यभार स्वीकारता म्हणुन केंद्रप्रमुख पद भरले जात नाहीत. त्यामुळे राज्यातील शिक्षक यापुढे केंद्रप्रमुख नमस्कार पदाचा राजीनामा कार्यभार नाकारतील.

अध्यक्षांनी शिक्षकांच्या अनेक प्रश्नां संदर्भात उहापोह केला. शिक्षकांच्या वेतनश्रेणीत असलेल्या त्रुटी त्रुटीसमिती समोर पुराव्यासह मांडल्या. त्यामुळे पुढील महिन्यात शिक्षक समिती साक्ष नोंदविण्यात येईल. शिक्षक नेते,आदरणीय केदूजी देशमाने यांच्या सेवानिवृत्तीपर त्यांना संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page