✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

वेंगुर्ले तालुक्यातील आडारी भेंडमळा येथील जयराम गावडे यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत वन्यजिवप्राणी “कोल्हा” पडला असल्याची माहिती आज शनिवारी १५.६.२०२४ रोजी सकाळच्या वेळी मिळताच वेंगुर्ला येथील वनाधिकारी यांनि ती दूरध्वनी द्वारे कुडाळ वनपरिक्षेत्र यांच्या कानी घातल्यानंतर कुडाळ येथून “रेस्क्कू ची टीम” घटनास्थळाचे ठिकाणी पोहोचली त्यानी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले परंतु विहीर कोरडी असलेने व आकाराने १० फुट व्यासाची व अंदाजे 35-40 फुट खोल आणि पूर्णतः जीर्ण झाली असलेने पडझड होऊन वन्सप्राणी जखमी होण्याची शक्यता दाट असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता सदर ठिकाणी श्री. संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल (प्रा) कुडाळ, सावळा कांबळे, वनपाल मठ, विष्णू नरळे, वनरक्षक तुळस, राहुल मयेकर, वाहनचालक यांनी स्थानिक नागरिक श्री. राधाकृष्ण पेडणेकर, हेमंत आडारकर, कौस्तुब गावडे, वामन पेडणेकर, रमेश नार्वेकर, वसंत पेडणेकर, बाबल गवंडे, अजित पेडणेकर यांच्या मदतीने व सुमारे दोन तासाच्या अथक परिश्रमा नंतर वन्मप्राणी कोल्हा सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले तदनंतर पशुधन विकास अधिकारी वेंगुर्ला यांचेकडून सदर कोल्ह्याची आरोग्य तपासणी केल्यावर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सदरची बचाव मोहीम श्री. नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी; डॉ. श्री. सुनील लाड, सहायक वनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी सहकार्य दिलेल्या ग्रामस्थांचे आभार मानून प्रत्येक वन्मप्राणी यांचे अन्न साखळीतील महत्व वैशिष्ट्यपूर्ण असलेने अशा बचाव अभियानात नागरिकांनी सहकार्य करण्याचे तसेच अश्या वणक्षेत्रालगत असणाऱ्या विहिरी बंदिस्त करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page