✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ.

आज शुक्रवार १४ जुन २०२४ रोजी जागतिक रक्तदाता दिन आहे.या दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकवेळा (५० किंवा अधिक वेळा) रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सत्कार केला जातो.यानिमित्ताने कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कुडाळ नगरपंचायत चे माजी नगरसेवक ऐजाज नाईक यांचा सत्कार ओरोस येथील जिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढी च्या वतीने करण्यात आला.१०० पेक्षा अधिक वेळा रक्तदान केलेले दाते देखील आपल्या जिल्ह्यात आहेत.तसेच अती दुर्मिळ गटाचे राखीव रक्तदाते देखील निस्पृह भावनेने नेहमी रक्तदान करीत असतात.रक्तच तर आहे… एकाच रंगाचे.. सर्व धर्मीयांचे.. कोणताही जातीभेद न करता प्राण वाचवणारे..रक्तदान सर्वश्रेष्ठ दान…आहे त्यामुळे रक्तदान हे केलेच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page