कुडाळ गोवेरीतील युवकांचा मनसेत प्रवेश
कुडाळ /-
आज आज दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका संघटनेची मासिक बैठक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे अध्यक्षतेखाली कुडाळ मराठा समाज हॉल येथे पार पडली.सदर बैठकीस जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य तसेच पक्षाचे सर्व जिल्हापरिषद मतदारसंघनिहाय उपतालुका अध्यक्ष,विभाग अध्यक्ष,उपविभाग अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य व विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील दत्तात्रय गावडे,शुभम गावडे आदि युवकांनी मनसेत प्रवेश केला.केला.या बैठकीत *मनसेच्या कुडाळ शहर सचिवपदी रमाकांत नाईक तर कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी गुरु मर्गज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.* पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार उपरकर यांनी पक्षात प्रवेश केलेल्या व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व आगामी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मनसेच्या *”गाव तिथे मनसेचा झेंडा”* या भगवा सप्ताह उपक्रम राबवण्याची घोषणा केली.