रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग मार्फत आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर 3 मशीन्सचे लोकार्पण…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग मार्फत आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर 3 मशीन्सचे लोकार्पण…

कुडाळ /-

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर 3 मशीन्सचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष सचिन मदने व शहर इन्व्हेस्टमेंट सल्लागार डी. बी. देसाई, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर प्रणय तेली यांच्या हस्ते डॉ. नवांगुळ हाॅस्पिटल कुडाळ येथे करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे गजानन कांदळगावकर, शशिकांत चव्हाण, रवींद्र।परब, सचिव अभिषेक माने, खजिनदार अमित वळंजू, डी. के. परब, इनरव्हीलच्या गीतांजली कांदळगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र संचलित रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र कुडाळचे अध्यक्ष महेश कुडाळकर, श्रीधर गोरे, समिरा प्रभू, राहूल जोशी, मुकुंद सप्रे, श्री देव कुडाळेश्वर भजन मंडळाचे सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, विलास बाक्रे आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने चिंतेची बाब दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटरची मर्यादित संख्या पाहता रूग्णाना कोल्हापूर, मुंबई, गोवा, येथे हलविले जात असताना आॅक्सिजन लेवल कमी झाली तर होणाऱ्या प्रवासात काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ही समस्या लक्षात घेता रूग्णाला व्हेंटीलेटर मिळेपर्यंत निसर्गातील हवेतील आॅक्सिजन अखंडितपणे सहज पुरवठा करण्याचे कामही मशिन करते. ही मशीन हाताळायला एकदम सोपी आहे. यासाठी आॅक्सिजन सिलेंडरची आवश्यकता नसल्याचे जनकल्याण समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. योगेश नवांगुळ यांनी सांगितले.

तर सद्यस्थितीत या मशीन्सची गरज ओळखून जनसामान्य कोवीड रूगाणांना सहजपणे आॅक्सिजन पुरवठा करून प्राण वाचावेत आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त सहयोगातून या मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अभिजित परब, रूपेश तेली, मयूर शिरसाट, संजय पिंगुळकर, मकरंद नाईक, एकनाथ पिंगुळकर, राजीव पवार, पेमेंद्र पोरे, डॉ राजवर्धन देसाई, आनंद वेंगुर्लेकर, प्रमोद भोगटे, गीतांजली कांदळगावकर, स्वाती डूबळे, आदी रोटरी सदस्यांनी तर श्री देव कु

अभिप्राय द्या..