कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी मिळालेल्या कोरोना अहवालात एकूण रुग्ण ०५ आढळून आले असून कुडाळ १ तर तालुक्यात आतापर्यंत ९७६ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात कुडाळ १, वाडीवरवडे १, घावनाळे -खुटवळ १, जांभरमळा १, पाट १ असे रूग्ण आढळून आले आहेत.
तसेच तालुक्यात ३७७ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३३१ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ४६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ९७६ तर बरे झालेले रुग्ण ७७३ आणि सक्रिय रुग्ण १७६ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.