ब्युरो न्यूज /-
▪️भीमा कोरेगाव; एनआयकडून आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठजणांविरोधात एफआयआर
▪️सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास हरकत नाही; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
▪️मराठी अस्मितेसाठी वृद्ध लेखिकेचा १६ तासाहून अधिक काळ लढा; मुजोर सराफाला मनसेचा हिसका
▪️पुण्यात २० कोटी रुपयांच्या ड्रग्ससह ५जण ताब्यात; नारकोटिक्स विभाग बॉलिवूड कनेक्शनची चौकशी करत आहे
▪️एका वर्षात ८८ देशातील ९.७ कोटी लोकांपर्यंत मदत पोहचवणाऱ्या यूएनच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला यंदाचा शांततेचा नोबेल जाहीर
▪️ दहशतवादविरोधी पथकाने केली एका कर्मचार्यास नाशिकमधून अटक; आयएसआयला पुरवत होता भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती
▪️मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून १० ऑक्टोबर, शनिवारी बंदचं आवाहन केलं आहे.
▪️चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा केसमध्ये लालूप्रसाद यादवांना झारखंड हायकोर्टाने जामीन; पण तुरुंगातून येऊ शकले नाहीत बाहेर
▪️ रेपो रेटमध्ये होणार नाहीत कोणतेही बदल; मात्र जीडीपी ग्रोथमध्ये ९.५ टक्के घसरण होण्याचा अंदाज
▪️प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्तेंविरोधात साताऱ्यात अदखलपात्र गुन्हा दाखल; दोघांनी राजेंविरोधात केले होते आक्षेपार्ह वक्तव्य