विकासाचे परिपूर्ण आणि शाश्वत मॉडेल उभारणार: सरपंच चंद्रकांत गोलतकर

मसुरे /-

माणगाव येथील भगीरथ प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पळसंब गावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गावातील गावठाण, वरची वाडी, खालची वाडी, वायंगणकर वाडी, आपकर वाडी, बौद्ध वाडी आणि डीगी या वाडयांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. गावातील प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जात या सर्व्हेतून गावाची खऱ्या अर्थाने आर्थिक नस शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत गावातील बचत गट तसेच इतर कृषीपूरक उद्योगांबाबत, बायोगॅस सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी गावातील शेतीचा आढावा घेत पाण्याचे स्रोत देखील तपासण्यात आले.

आगामी काळात गावात ग्रामस्थांनी ग्रामस्थांसाठी उभे केलेले विकासाचे परिपूर्ण आणि शाश्वत मॉडेल भगीरथ प्रतिष्ठानला अपेक्षित आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्याचा मानस आहे.बचतगटांच्या स्वयंपूर्णतेसाठी, युवकांच्या सक्षमीकरणासाठी प्रतिष्ठानकडून आतापर्यंत सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याची तयारी असून आता प्रत्येकाने आपले ध्येय बाळगून आगेकूच करण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे विकासाच्या या गंगेचा लाभ घेण्यासाठी आगामी काळात प्रतिष्ठानकडून गावात होणाऱ्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहे असे आवाहन सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.

यावेळी सरपंच चद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत , नविन मालवणकर , दिपक नाखरे, उल्हास सावंत , वैभव परब , अमित पुजारे ,प्रमोद सावंत ,विनय साटम ,रोशन चिचंवलकर , सदेश सावंत , वासूदेव परब तसेच भगीरथ प्रतिष्ठान सदस्य, पळसंब ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page