▪️पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

जिल्ह्यास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे. जिल्ह्यातील २२६ माध्यमिक शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त करत प्रशालेने रू. ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे हे विशेष गौरवास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page