आय टी आयचे प्रवेश प्रक्रिया केंद्र आता वनविभागाच्या विश्रांती गृहात..

आय टी आयचे प्रवेश प्रक्रिया केंद्र आता वनविभागाच्या विश्रांती गृहात..

शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांच्या प्रयत्नांना आले यश..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्याची आय टी आय ची इमारत ही शासनाने कोविड सेंटर म्हणून अधिग्रहित केली आहे त्यामुळे या ठिकाणी कोविड 19 चे रुग्ण व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना उपचारासाठी या इमारतीत ठेवले जात आहेत मात्र त्याचबरोबर आता आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ही सुरु झाल्यामुळे ती कुठे घ्यायची हा येथील प्रवेश प्रक्रिया समितीसमोर मोठा प्रश्न होता यावेळी आयटीआयच्या समोरील मोकळ्या जागेतील पार्किंगच्या इमारती तात्पुरते प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले होते मात्र ही इमारत उघड्यावर असल्यामुळे तसेच या ठिकाणी प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना संसर्ग होण्याची भीती होती याकडे शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी संबंधित विभागाची चर्चा करू लक्ष वेधले होते व हे प्रवेश प्रक्रिया केंद्र वनविभागाच्या विश्रांती गृहात हलवण्याची प्रक्रिया सुरू होती.

अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून हे प्रवेश प्रक्रिया केंद्र दोडामार्ग वन विभागाच्या विश्रांतीगृह सुरू करण्यात आले आहे शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी या केंद्रावर ती भेट देत पाहणी केली असता या केंद्रावरील प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्गाने त्यांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..