▪️२८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ५० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून यामध्ये २८ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीत तर एकूण ५० टक्के विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यापीठाच्या नवीन मुल्यांकन पद्धतीनुसार परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी ही सेमिस्टर ग्रेड परफॉर्मंस इंडेक्स (SGPI) या पद्धतीने जाहीर करण्यात येते. यानुसार विद्यार्थ्यांना एकूण दहा गुणांपैकी मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात. यामध्ये कॉलेजच्या ज्योती विजय नाटलेकर (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) हिने ९.९४ गुण मिळवत प्रथम, ओम मिलिंद रेठारेकर (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) याने ९.०८ गुण मिळवत द्वितीय, वैष्णवी सुर्यकांत डांगी (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) हिने ८.८९ गुण मिळवत तृतीय तर भावेश चंद्रकांत मुंडये (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) याने ८.३३ गुण मिळवत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे.

यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे हे पहिलेच पदवी अभियांत्रिकीचे वर्ष असून पहिल्याच वर्षी उत्तम निकाल लागल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य डॉ.रमण बाणे व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page