वैभववाडी /-
गोवा ते उरण पनवेल असा मारुती सुझुकी कार मधून विना परवाना गोवा बनावटीची दारूची वाहतूक केल्या प्रकरणी वैभववाडी पोलीसानी 3 लाख 9 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .आरोपी वेदांत कमलाकर घरत वय 26 रा.उरण गव्हाण यांच्या वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही घटना 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास घडली .
गोवा ते वैभववाडी करूळ मार्गे कोल्हापूर – पनवेल असा प्रवास मारुती सुझुकी कार मधून आरोपी वेदांत कमलाकर घरत वय 26 वर्षे राहणार उरण गव्हाण ,तालुका पनवेल, जिल्हा रायगड असा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी कारमधून विना परवाना गोवा बनावटीच्या 11बॉटल सुमारे 9 हजार 700 रुपये किमतीची दारू व 3 लाख किंमतीची कार असा 3 लाख 9 हजार 700 रुपये चा मुद्देमाल वाहून पोलीस कॉन्स्टेबल विलास राठोड व पोलीस हवालदार संदीप राठोड यांनी जप्त केला.या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार संदीप राठोड यांनी वैभववाडी पोलीस स्टेशन ला दिली अधिक तपास सहाय्यक पोलिस अधिकारी रविकांत अडुळकर करत आहेत.