वैभववाडी /-

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांची जिल्हा परिषद अंतर्गत विशाखा समिती मार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे . यामध्ये जर दोषी आढळल्यास त्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे ,अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यानी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी गटविकास अधिकारी विद्या गमरे,सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकारांनी विविध विषय मांडले त्या विषयावर सविस्तर त्यांनी चर्चा केली.
वैभववाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरला वेळोवेळी अश्लील मेसेज पाठवून तसेच तिला वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या अनुषंगाने जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी गुरुवारी दुपारी पंचायत समिती वैभववाडीला भेट दिली . यावेळी ते म्हणाले जिल्हा परिषद अंतर्गत विशाखा समिती नेमण्यात आली आहे.या समितीचे मार्फत महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी करून या मध्ये दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
तसेच यापूर्वी महिला डॉक्टर ने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक यांच्याकडेही आपल्याला होणाऱ्या त्रासा वाबत तक्रार दिलेली होती. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांनीही त्या महिला डॉक्टरच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक व वरिष्ठ आरोग्य कार्यालयात तक्रार केलेली आहे.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे . यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कायदेशीर योग्य ती कारवाई होणार आहे.
वैभववाडी पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग मार्फत सन 2019 – 20 या आर्थिक वर्षामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले .त्या प्रशिकणावर अवाजवी भरमसाठ बिले तयार करून शासनाच्या निधीचा अपव्यय केल्याबाबत माहितीच्या अधिकारात उघड झाले होते.अशा बातम्या वृत्त पत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या.या बाबत पत्रकारांनी विचारले असता पंचायत समिती प्रशिक्षण खर्च केलेल्या बाबींचा चौकशी सुरू आहे .या मध्ये काही गोष्टींची पडताळणी आपण आता करू शकत नाही, मात्र काही गोष्टींची केलेल्या खर्चाची पडताळणी केली जाणार आहे .याबाबत जे दोषी असतील त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले .
वैभववाडी पंचायत समिती नवीन इमारत दोन वर्षापूर्वी बांधकाम पूर्ण झालेले आहे.या इमारतीवर कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली आहे.मात्र ही इमारत अद्यापही वापराविना आहे .या इमारतीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे .याबाबत तज्ञ व्यक्तीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे .इमारत मंजुरी केव्हा मिळाली शासनाच्या निविदा प्रक्रिया व त्या अनुसरून अटी-शर्तीची तपासणी करण्यात आहे .इमारतीवर आता पर्यंत झालेला खर्च व अजून होणारा संभाव्य खर्च यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे इमारतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे.असे त्यांनी सांगितले.
कोविड संसर्ग बाबत आपला जिल्हा अन्य जिल्ह्याच्या तुलनेत चांगले काम केलेले आहे.माझे कुटुंब ,माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यामध्ये सुरू आहे .या मोहिमेमध्ये आशा ,अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी चांगले काम करत आहेत.सर्व कर्मचारी गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची माहिती घेत आहेत .त्या कर्मचाऱ्यांना सर्व जनतेने खरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page