वेंगुर्ला /-
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील प्रत्येक निवासी व वाणिज्यिक मालमत्तांना वेगवेगळे मालमत्ता क्रमांक दर्शविणारे एकापेक्षा जास्त बिल्ले आहेत.त्यामुळे विविध अडचणी येत आहेत.याबाबत प्रत्येक घरावर घर नंबर दर्शविणारे कायमस्वरूपी बिल्ले देण्यात यावेत,याबाबत नगरसेवक प्रशांत आपटे यांनी ठराव मांडला व त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,तुषार सापळे,धर्मराज कांबळी,साक्षी पेडणेकर,शैलेश गावडे,दादा सोकटे,प्रशांत आपटे,संदेश निकम,कृतिका कुबल,कृपा गिरप,पूनम जाधव,विधाता सावंत,प्रकाश डिचोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी तात्पुरत्या मच्छिमार्केटच्या जागेवर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट उभारून मच्छिविक्रेत्यांची सोय करणे,कंपोस्ट डेपोमध्ये काही सुधारणा करण्यासाठी वेगवेगळी मशिनरी घेण्याचे ठरले,तसेच कंपोस्ट डेपोमध्ये फुलझाडे आणि फळझाडे रोपे विकत घेण्यास मंजुरी देण्यात आली.