मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत
सिंधुदुर्ग /-
जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून राजेंद्र दाभाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ सचिव राजेश टांगसाळी ,पांचाळे, बाबल गावडे आदी उपस्थित होते.