मालवण /-

मालवण नगरपरिषद हद्दीमध्ये प्रत्येक गल्ली-बोळात रस्त्यावर भटके कुत्रे व बेवारस जनावरे रात्रंदिवस फिरत असतात. बाजारपेठेतील दुकानांच्या ओट्यावर , पायऱ्यांवर घाण करतात त्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होतो . नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक यांना वारंवार सांगून सोशल मीडियाद्वारे फोटो पाठवून त्यावर काहीच उपायोजना केली जात नाही. म्हणून मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कडे निवेदन सादर करून या बाबीकडे लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सचिव महेश अंधारी यांनी लेकी निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी दादा मोरे , युवक जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे , चंदन पांगे ,पल्लवी तारी , प्रभाकर हेदुळकर , श्रीहरी खवणेकर ,सरदार ताजर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page