✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ.

सिंधु संजीवनी ग्रुप आयोजित केंद्र शाळा पाट वरचावाडा येथे झालेल्या रक्तदान शिबीरात 78 जणांनी केले रक्तदान केले आहे.या रक्तदान शिबिराचे श्री. गणेश माधव आणि श्री. मंदार प्रभू पाटकर या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.रक्तदान शिबिरास पाट गावचे सरपंच सौ.परब,आंदुर्ले गावचे सरपंच अक्षय तेंडोलकर आणि सिंधू संजीवनी ग्रुपचे सर्व सभासद उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात बॅ. नाथ पै नर्सिंग स्कूल आणि फिजिओथेरपी कॉलेज कुडाळ च्या प्रशिक्षणार्थ्यांनी मोलाची मदत केली.जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमण टीम आणि सिंधू संजीवनी ग्रुप यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले सर्व रक्तदात्यांचे वृक्ष वाटप करून सत्कार करण्यात आले.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page