जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टीडीएस संस्थेमार्फत पोस्टकार्ड आंदोलन सुरू..

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टीडीएस संस्थेमार्फत पोस्टकार्ड आंदोलन सुरू..

मालवण /-

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी टी डी एस संस्थेमार्फत *पोस्टकार्ड आंदोलन* सुरू करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून पर्यटन व्यावसाईकांनि तारकर्ली पोस्ट येथे उपस्थित राहून या व्यवसायावर अवलंबून असलेले घरातील व्यक्ती व कामगार आपल्या समस्या लाल शाहीने पोस्टकार्ड वर लिहुन पर्यटन व्यावसाईक संकटात आहेत याविषयी पर्यटन मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांना मंत्रालय मुंबई येथे पाठविले पोस्टकार्ड पत्र पाठऊन सरकारचे लक्ष वेधले गेले आहे हे आंदोलन पंधरा दीवस चालणार असून या कठीण प्रसंगात पर्यटन मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांनी पर्यटन व्यावसाईकां सोबत राहून खऱ्या अर्थाने पर्यटन व्यावसाईकांस न्याय द्यावा अशी मागण्याकरण्यात आली आहे.:-श्री बाबा मोंडकर , अध्यक्ष .टी टी डी एस .

संस्थेस विश्वास आहे की संस्थेने केलेल्या आवाहनाला साद देऊन जिह्यातील पर्यटन व्यावसाईक, कामगार व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ५००० पेक्षा जास्त कुटुंब व विविध हॉटेल, संघटनानि भाग घेतील असे विश्वास टी टी डी एस संस्थेस आहे .
यावेळी संस्था अध्यक्ष श्री बाबा मोंडकर , रवींद्र खानविलकर , डॉ .रामचंद्र परब , रामा चोपडेकर, मनोज खोबरेकर, मिलिंद झाड, सहदेव साळगावकर , केदार झाड , बाळू मुंडये, दादा वेंगुर्लेकर , मनीष खोत, प्रभाकर वाळवे आदी पर्यटन व्यावसाईक उपस्थित होते

अभिप्राय द्या..