✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

अखेर सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याला न्याय मिळाला मा.ना.श्री.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशावरून ठाणे येथील मुख्यमंत्री शिंदे यांचे खंदे समर्थक श्री.राजेंद्र फाटक शिवसेना नेते शहरप्रमुख तथा ओवळा माजिवडा विधान सभा क्षेत्र यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राजेंद्र फाटक हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अतिशय विश्वासू शिलेदार असून ते कट्टर शिवसैनिक आहेत.त्यामुळे सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित शिवसेना पक्ष निरीक्षक राजेंद्र फाटक हे सिंधुदुर्ग जिल्हात केव्हा येतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page