वैभववाडी /-
शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने जाहीर केल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात बंद असलेले मोबाईल टॉवर, नेटवर्क चा अभाव व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आदी असंख्य अडचणीमुळे ऑनलाइन पद्धतीत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच राहणार आहे.असे मत भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केले आहे. ऑनलाइन परीक्षेला विरोध कोणाचाही नाही. आणि असण्याचे कारणही नाही. परंतु ऑनलाइन साठी लागणाऱ्या सुविधा नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी करायचे काय ? असा संभ्रम सध्या विद्यार्थी, पालक व नागरिक यांना पडला आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास ते कधीही आपल्याला माफ करणार नाहीत.
सद्या वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील बी .ए . व बी.कॉम च्या शेवटच्या वर्षच्या परीक्षा सुरू आहेत.विध्यार्थी डोंगराच्या टेकडीवर किंवा डोंगरावर झोपडीत बसून ऑनलाईन परीक्षा देतांना जीव मुठीत घेऊन परीक्षा देत आहेत.
याचा संबंधित यंत्रणेने विचार करन ऑनलाइन परीक्षा घेताना प्रशासनाने योग्य सेवा सुविधा पुरवाव्यात. आणि कुशाल परीक्षा घ्याव्यात असे काझी यांनी सांगितले आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. परंतु संबंधित मशिनरी हाताळणा-या कर्मचाऱ्यांच्या जागा गेली अनेक वर्ष रिक्त आहेत. त्यामुळे त्या मशिनरी धूळखात पडल्या आहेत. शासनाला रिक्त जागा भरणे शक्य नसेल तर कंत्राटी पद्धतीने या जागा भरण्यात याव्यात. सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा काझी यांनी दिला आहे. या रुग्णालयात नवीन एक्स-रे मशीन आहे. सुसज्ज लँब आहे. परंतु टेक्निशियन नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही.
रुग्णांना रिपोर्ट करण्यासाठी खासगी लॅबमध्ये शेकडो रुपये मोजावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. त्याही भरण्यात याव्यात. तालुका कोव्हीड केअर सेंटरमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा. अशी मागणी काझी यांनी केली आहे