मालवण /-
प्रामाणिक सेवा बजावणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांची पेेेण येथे बदली झाली आहे. ‘साहेब अजून काही वर्षे तुम्ही मालवणात हवे होता’ अश्या भावना मालवण वासीयांकडून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, मालवण तालुका शिवसेना, स्वराज्य सामाजिक-सांस्कृतिक संस्था, स्वराज्य महिला ढोल पथक यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लवकरच प्रांताधिकारी पदी बढती होऊन पुन्हा मालवण-कुडाळला या अश्या सदिच्छा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, रवी तळाशीलकर, अनंत पाटकर, यासह पालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आवेक्षक सुधाकर पाटकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार यांच्या १९ महिन्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक संजय गांधी निराधार योजना लाभ लाभार्थी जनतेला देण्यात आला. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच कार्यकाळात शांततेत पार पडल्या. कोरोना काळात तर रस्त्यावर उतरून जनजागृती, गरजूना धान्य वाटप, यासह अविरत सेवाकार्य तहसीलदार पाटणे यांनी केले. मालवण शहर सुरवातीचे चार महिने कोरोनामुक्त ठेवण्यात तहसीलदार अजय पाटणे यांची भूमिका मोलाची राहिली. आजही मालवण शहर व तालुक्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. अश्या अनेक आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी तहसीलदार यांच्या कार्याचा गौरव केला.
‘नारी’ शक्तीच्या वतीनेही सन्मान
स्वराज्य सामाजिक सांस्कृतिक संस्था व स्वराज्य महिला ढोल-ताशा पथक यांच्या वतीने अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत, खजिनदार सौ. प्रतिभा चव्हाण
यांनी तहसीलदार यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या. यावेळी साक्षी मयेकर, रूपा कुडाळकर, कृपा कोरगावकर, दिया पवार यासह अन्य महिला उपस्थित होत्या. मालवणातील आपली सेवा राज्यात आदर्शवत अशी आहे. कोरोना काळातही जीव धोक्यात घालून आपण जनसेवा केली. अश्या शब्द सुमानांनी शिल्पा खोत यांनी तहसीलदार अजय पाटणे यांच्या कार्याचा गौरव केला.