दोडामार्ग /-
भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या उर्वरित मंडल आणि शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या.
दोडामार्ग मंडल अध्यक्षपदी प्रवीण गवस, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी अजय गोंधावळे तर दोडामार्ग शहर अध्यक्षपदी पांडुरंग बोर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा चिटणीसपदी सुधीर दळवी आणि दोडामार्ग तालुका प्रभारीपदी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही माहिती प्रभाकर सावंत जिल्हा सरचिटणीस (संघटन)
भाजपा सिंधुदुर्ग यांनी दिली.