माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खा.नारायण राणे यांची कोरोनावर मात

माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खा.नारायण राणे यांची कोरोनावर मात

कणकवली /-

माजी मुख्यमंत्री,भजापा नेते खासदार नारायण राणे यांनी कोरोनावर पूर्णतः मात केली आहे.लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबई येथील आपल्या अधीश निवासस्थानी परतले आहेत.त्यांची प्रकृती पूर्णतःबरी झाली आहे.
माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त कळताच त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून राज्यभरातून कार्यकर्ते हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा दिल्या जात होत्या.त्या सर्व हितचिंतकांचे राणे कुटूंबाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..