आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन..

आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन..

आंबोली /-

येथील आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन दिले.हा प्रकार काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी शहरातील युवकांनी त्याला पाहिले,परंतु गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येतात तो दरीत उडी टाकून पळून गेला.

दरम्यान सात ते आठ वर्षापूर्वी याठिकाणी आढळलेल्या ब्लॅक पॅंथर ची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आहे याबाबत वन विभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी दुजोरा दिला असून आपल्या आंबोली जंगलात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे काळ्या रंगाचे बिबटे आहेत असा दावा त्यांनी केला.घनदाट जंगलात राहत असल्यामुळे त्यांचा रंग बदलतो त्यांनी सांगितले आंबोली घाट विविध प्रकारचे पक्षी प्राणी आढळतात.

दहा वर्षांपूर्वी या ठिकाणी ब्लॅक पॅंथर आपले अस्तित्व दाखवून दिले होते त्यामुळे या काळ या बिबट्याच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी असलेली जैवविविधता चर्चेत आली आहे .याबाबत श्री पुराणिक म्हणाले घनदाट जंगलात राहत असल्यामुळे त्या बिबट्याचा रंग कसा बदलतो.

अभिप्राय द्या..