कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण.;कोणत्या गावी किती वाचा..

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण.;कोणत्या गावी किती वाचा..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोना रुग्ण १५आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ९१५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कुडाळ ४, आकेरी ५, कविलकाट्टे ३, वालावल-हुमरमळा १, मुणगी १, तुळसुली तर्फ माणगांव १ असे रुग्ण आढळले.तसेच तालुक्यात ३२९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २८५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ४४ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ९१५ तर बरे झालेले रुग्ण ६८९ आणि सक्रिय रुग्ण २०१ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २५ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..