ब्युरो न्यूज /-

गूगलने जुलै ते सप्टेंबरदरम्यान प्ले स्टोरवरुन google play store 34 ऍप्स डिलीट केले आहेत.या 34 ऍप्समध्ये जोकर मालवेयर joker malware आढळल्यानंतर गूगलकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. जोकर धोकादायक व्हायरस असून गेल्या काही महिन्यांपासून अनेक ऍप्सवर त्याचा परिणाम झाला आहे. याबाबत माहिती मिळल्यानंतर गूगलने त्वरित असे ऍप्स प्ले स्टोरवरुन डिलीट केले आहेत.
हा जोकर मालवेयर एक प्रकारचा मॅलिशियस बॉट malicious bot आहे, ज्याला fleeceware म्हणून कॅटेगराईज करण्यात आलं आहे.
या मालवेयरचं काम SMSवर खोटं क्लिक करण्याचं असतं, ज्यामुळे युजर्सच्या अकाऊंटमधून नको असलेली प्रीमियम पेड सर्व्हिस सब्सक्राईब होते.

याबाबत युजर्सला कोणतीही माहिती नसते. या स्पायवेयरला SMS मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोनमधील माहिती चोरण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.
हा मालवेयर युजर्सला छुप्यारितीने, प्रीमियम वायरलेस ऍप्लिकेशन प्रोटोकॉल म्हणजेच WAP सर्व्हिससाठी साईन-अप करुन देतो.
>>All Good PDF Scanner
>>Mint Leaf Message-Your Private Message
>>Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons
>>Tangram App Lock
>>Direct Messenger
>>Private SMS
>>One Sentence Translator – Multifunctional Translator
>>Style Photo Collage
>>Meticulous Scanner
>>Desire Translate
>>Talent Photo Editor – Blur focus
>>Care Message
>>Part Message
>>Paper Doc Scanner
>>Blue Scanner
>>Hummingbird PDF Converter – Photo to PDF
>>All Good PDF Scanner
>>com.imagecompress.android
>>com.relax.relaxation.androidsms
>>com.file.recovefiles
>>com.training.memorygame
>>Push Message- Texting & SMS
>>Fingertip GameBox
>>com.contact.withme.texts
>>com.cheery.message.sendsms (two different instances)
>>com.LPlocker.lockapps
>>Safety AppLock
>>Emoji Wallpaper
>>com.hmvoice.friendsms
>>com.peason.lovinglovemessage
>>com.remindme.alram
>>>Convenient Scanner 2
>>Separate Doc Scanner
गूगलने या मालवेयरची ओळख ‘Bread’ (Joker) म्हणून केली आहे. जो 2017 मधील मोठ्या प्रमाणात बिलिंग फसवणूकीचा ग्रुप आहे. जो त्या ऍप्सची ओळख करतो, जी केवळ SMS फसवणूकीसाठी डिझाइन करण्यात आली आहेत. हे ऍप्स फोनमधील डेटासाठी अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे गूगलने हे ऍप्स असल्यास त्वरित डिलीट करण्याचं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page