मालवण /-

भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ – मालवण विधानसभा बुथ रचना संयोजकपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.भाजपा राज्यात व देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. पक्षासाठी आगामी तीन वर्षे फार महत्वाची आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकार क्षेत्रातील निवडणुका या काळात होणार आहेत. प्रमुख पक्ष या नात्याने या सर्व निवडणुका जिंकणे हे ध्येय पक्षासमोर आहे. यासाठी प्रत्येक बुथ जिंकणे गरजेचे आहे. यासाठी सर्व बुथ रचना सक्षम करण्यासाठी सावंत यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपाच्या संघटनपर्वात एक कोटीहुन अधिक नागरिक राज्यात पक्षाचे सदस्य झाले आहेत. समाजाच्या सर्व घटकांशी भाजप पक्ष जोडला गेला आहे. अनेक नवे लोक भाजपात दाखल झाले आहेत. या सर्वांना सोबत घेवुन पुढे जायचे आहे. आपला अनुभव आणि पक्षासाठी योगदान भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाढीसाठी भविष्यात अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीचे काम उभे राहिल याकडे आपण लक्ष द्याल यात दुमत नाही. एक राजकीय इतिहास घडविणाऱ्या प्रक्रियेचे आपण घटक आहोत. पक्षाने आपल्यावर दिलेली जबाबदारी उत्साहाने पार पाडु या. असे श्री. तेली यांनी सावंत यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page