▪️पहिल्या टप्प्यात शहरातील सहभागी झालेल्या ५ जणांच्या गणेश सजावटीचे परीक्षण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेच्या परीक्षणाला सुरवात करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यात शहरातील सहभागी झालेल्या ५ जणांच्या गणेश सजावटीचे परीक्षण करण्यात आले हे परीक्षण कला दिग्दर्शक महेश कुडाळकर यांनी केले.

कुडाळ नगरपंचायतीच्यावतीने शहर अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून स्पर्धेमध्ये २४ जणांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेचे परीक्षण सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात ५ जणांचे परीक्षण करण्यात आलेले आहे यामध्ये गौरव किनळेकर, शैलजा कांबळी, साई तळवणेकर, प्रथमेश राऊळ, राहुल पाटणकर यांच्या गणेश आरास सजावटीचे परीक्षण करण्यात आले. यावेळी गणेश सजावट स्पर्धा समितीचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सौ.अक्षता खटावकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. आफ्रीन करोल, आरोग्य सभापती सौ. श्रुती वर्दम, भाजपा गटनेता श्री. विलास कुडाळकर, नगरसेविका सौ. श्रेया गवंडे, चांदणी कांबळी, स्वच्छता निरीक्षक श्री.संदीप कोरगावकर, शहर समन्वयक सिद्धेश ठाकूर, लिपिक गजानन पेडणेकर, संजय टेंबुलकर उपस्थित होते यावेळी सहभागी स्पर्धकांना भाजप गटनेता विलास कुडाळकर यांच्या मार्फत वृक्ष भेट व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. पुढील १९ स्पर्धकांच्या गणेश आरास सजावट स्पर्धेचे परीक्षण गणेश चतुर्थीच्या ६, ७, ८ व ९ व्या दिवशी केले जाणार आहे.

फोटो:- साई तळवणेकर यांच्या गणरायाचे परिक्षण केल्यावर भाई तळवणेकर यांना वृक्ष भेट देताना भाजप गटनेता विलास कुडाळकर तसेच नगराध्यक्ष अक्षता खटावकर, नगरसेविका आफ्रिन करोल, श्रृती वर्दम आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page