वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक वर्क ८ -१० दिवसात पूर्ण करण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांचे आदेश

वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक वर्क ८ -१० दिवसात पूर्ण करण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांचे आदेश

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन बांधकामचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.परंतु इलेक्ट्रिकचे काम पूर्ण न झाल्याने हॉस्पिटल अपूर्णावस्थेत आहे.त्यामुळे सदर हिस्पिटल कार्यान्वित होऊ शकत नाही. इलेक्ट्रिक वर्क ची १ कोटी ९० लाख रु.ची निविदा मंजूर झाले आहे.तरी याकरिता आपल्या स्तरावरून इलेक्ट्रिक विभागाला आदेश निर्गमित करण्यात यावेत,अशा प्रकारचे निवेदनाद्वारे मागणी वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री यांच्याकडे आज गुरुवारी करण्यात आली.
राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते.यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्याची वेंगुर्ला शिवसेना वतीने भेट घेण्यात आली.यावेळी
यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, वेंगुर्ले नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्री यांनी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला काम पुढील ८ -१० दिवसात करण्याचे आदेश दिले.यावेळी इलेक्ट्रिक उपअभियंता यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

अभिप्राय द्या..