भाजपचे नेते बंड्या सावंत यांची ‘आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड…

भाजपचे नेते बंड्या सावंत यांची ‘आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड…

कुडाळ /-

कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते भाजपचे नेते श्री.अनिल उर्फ बंड्या सावंत यांची ‘आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यात प्रधानमंत्री ‘आत्मनिर्भर ‘अभियान अंतर्गत बंड्या सावंत यांनी ,कोरोना कालावधीत असून देखील भारतीय जनता पक्षाचे चांगले चांगले काम करत,आत्मनिर्भर ‘अभियान संदर्भात चांगली जन जागृती केली.याच कामाची पोच पावती म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.राजन तेली यांनी बंड्या सावंत यांनी आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड केली आहे.

भारतीय जनता पार्टी, आत्मनिर्भर अभियान कुडाळ विधानसभा संयोजक हि अतिरिक्त जबाबदारी ही सावंत यांच्याकडे दिली आहे.भाजपा राज्यात व देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे.पक्षासाठी आगामी तीन वर्षे फार महत्वाची आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकार क्षेत्रातील निवडणुका या काळात होणार आहेत.तसेच कुडाळ नगरपंचायत निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन टेकली आहे.याच कारणास्तव बंड्या सावंत याना हे पद दिले आहे.प्रमुख या नात्याने या सर्व निवडणुका जिंकणे हे ध्येय आपल्या समोर आहे. केंद्र सरकारची आत्मनिर्भर अभियान विधानसभा जनतेपर्यंत,पोहचवण्यासाठी आपल्यावरती ही जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप पक्षाचे कोटीहुन अधिक नागरिक राज्यात आपल्या पक्षाचे सदस्य झाले आहेत. समाजाच्या सर्व घटकांशी आपला पक्ष जोडला गेलेला आहे.अनेक नवे लोक आपल्या पक्षात दाखल झाले आहेत. या सर्वांना सोबत घेवुन पुढे जायचे आहे. आशा आहे कि, आपला अनुभव आणि पक्षासाठी योगदान भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाढीसाठी भविष्यात अधिक महत्वपुर्ण ठरेल.शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीचे काम उभे राहिल याकडे आपण लक्ष द्यालयात दुमत नाही. एक राजकीय इतिहास घडविणाया प्रक्रियेचे आपण घटक आहोत.पक्षाने आपल्यावर दिलेली जबाबदारी उत्साहाने पार पडावी असे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नियुक्ती पत्र देताना संबोधले.

अभिप्राय द्या..