✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील रहिवासी अर्पिता आनंद परुळेकर (वय ४२) ही विवाहित महिला ब्लड कॅन्सर या गंभीर आजाराने त्रस्त असून तिच्यावर सध्या ठाणे (मुंबई) येथील जुपिटर हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिच्यावर वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे.सौ.अर्पिता आनंद परुळेकर, सध्या रा.मळेवाड हेदुलवाडी (पूर्वाश्रमीची रेश्मा लक्ष्मण नाईक, सावंतवाडी) यांना मागील दोन महिन्यांपासून त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर कुडाळ, गोवा बांबोळी तसेच मुंबई टाटा हॉस्पिटल येथे उपचार केल्यानंतर १३ ऑगस्ट पासून तिच्यावर ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.सध्या तिची परिस्थिती खूपच नाजूक असून तिला पुढील  उपचारासाठी सुमारे २० लाख रुपये एवढा खर्च येणार आहे.परुळेकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व उपचारासाठी मोठा खर्च असल्याने समाजातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी त्वरित आर्थिक पाठबळ पुरविणे आवश्यक आहे.आर्थिक सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.मदत करावयाची असल्यास ओंकार आनंद परुळेकर – मळेवाड. बँकेचे नाव : सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
,शाखा मळगाव. 
अकाऊंट नं. 079400000006279.
आयएफएससी कोड -SIDC0001079.तसेच 
मदत करायची असेल त्यांनी सदर खात्यावर किवा गुगल पे क्र.8855016870 येथे संपर्क करावा,असे आवाहन आनंद परुळेकर यांनी केले आहे.

Omkar Anand Parulekar.
Sindhudurga district Central co operative Bank ltd.
A/c no. : 079400000006279.
IFSC CODE : SIDC0001079.
Branch : Malgaon Sawantwadi.
G-Pay, Phone Pay no/ Mob no. 8855016870.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page